13 ऑक्टोबर रोजीची फेरफार अदालत रद्द
पुणे, महाराजस्व अभियान अंतर्गत एक महिन्याच्यावर प्रलंबित फेरफार निकाली काढण्यासाठी मंडळ मुख्यालयात आयोजित केलेली 13 ऑक्टोबर रोजीची फेरफार अदालत रद्द करण्यात आली आहे.
13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये फेरफार नोंदी निर्गत करणेबाबत कामकाज बंद राहणार आहे. पुढील फेरफार अदालतीची तारीख स्वतंत्ररित्या जाहीर करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.



