जेजुरी ! अखिल भारतीय पुर्व सैनिक सेवा परिषद, नवी दिल्लीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटनेच्या उपाध्यक्ष्यपदी प्रा. बाळासाहेब झगडे
अखिल भारतीय पुर्व सैनिक सेवा परिषद, नवी दिल्लीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटनेच्या उपाध्यक्ष्य पदी जेजुरीचे निवृत्त सु. मेजर(ऑनररी) आणि गुरुकुल स्कूलचे प्राचार्य बाळासाहेब झगडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय पुर्व सैनिक सेवा परिषद नवी दिल्ली हि भारत सरकार, संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेली संस्था असून देशपातळीवर ही संस्था काम करते. सेवा, साहस, सन्मान या त्रिसुत्रीने पुर्व सैनिकांच्या बाबतीत या परीषदेचे काम चालते. परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्रात विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर हे जिल्हे येतात.
जेजुरी येथील गुरुकुल स्कुलचे संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य बाळासाहेब झगडे यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांची या परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र मेजर जनरल अच्युत देव, एअर व्हाइस मार्शल जयंत ईनामदार, ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव, ब्रिगेडियर गावपांडे, कर्नल पाटील, कर्नल गोयल, ग्रुपकॅप्टन श्रीकांत वालवडकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
आपल्या उत्तरीय भाषणात प्राचार्य बाळासाहेब झगडे यांनी पुर्व सैनिकांनी देशसेवा केल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या शिस्तबध्द जिवणाचा उपयोग या समाजासाठी करावा व तीसुद्धा एक देशसेवाच आहे असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्रातून काही निवडक पुर्व सैनिक अधिकारी, जेसीओ उपस्थित होते.



