पुरंदर प्रतिनिधी सिकंदर नदाफ-महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाजाचे नेते आणि ठाणे महानगर पालिकेचे माजी महापौर तसेच शिवसेनेचे उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांना वाल्हे येथील महर्षी वाल्मिक ऋषींच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कोळी बांधवांच्या मेळाव्यात विविध सामाजिक तसेच राजकीय संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
वाल्हे नगरीत वाल्मिक ऋषींचा जयंती सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणात परंतु भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला .यावेळी ग्रामस्थांसह वारकरी संप्रदायाच्या वतीने ऋषींच्या समाधीवर अभिषेक तसेच मंदिरात फुलांचे किर्तन व इतर धार्मिक विधी संपन्न झाले .तर परगावाहून आलेल्या भाविकांनी देखील ऋषींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
या दरम्यान कोळी समाजाच्या मेळाव्यात स्वर्गीय अनंत तरे हे त्यांच्या सोज्वळ कार्यामुळे तमाम कोळी बांधवांसह वाल्हेकर ग्रामस्थांच्या कायमच आठवणीत राहिले असून त्यांच्या बद्दल भावना व्यक्त करताना अनेकांना अश्रू अनावर झाले.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे नूतन अध्यक्ष जयेश तरे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले सिद्धी विनायक फाउंडेशनचे गणेश जोजारे महर्षी वाल्मिकी वारकरी संघाचे ह.भ.प.अशोक महाराज पवार पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राज्य उपाध्यक्ष अरविंद चीव्हे तसेच प्रल्हाद कदम पोपटराव भेस्के ,शामराव आधटराव, मल्लूशेठ कोळी आदी मान्यवर उपस्थित होते .



