Type Here to Get Search Results !

महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्ष पदी ॲड.एन डी पाटील यांची निवड.

महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्ष पदी ॲड.एन डी पाटील यांची निवड.
पुणे, जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पुणे शहरात नावलौकिक प्राप्त शुक्रवार पेठ येथील प्रमुख कार्यरत कार्यालय असलेले "श्री शिवाजी मराठा सोसायटी"  चे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज कोल्हापूर,  उपाध्यक्ष राजेंद्र सोपान जगताप, ऑननरी सेक्रेटरी म्हणून कार्यरत जनार्दन ग.थोरात, जाॅइन्ट सेक्रेटरी विकास विठोबा गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, अध्यक्ष, नियामक मंडळ सदस्य सत्येंद्र  कांचन, अध्यक्ष, कारभारी मंडळावर कार्यरत पदमाकर गुलाबराव पवार इत्यादी सन्मानित पदाधिकाऱ्यांकडून सहमती दर्शवून " श्री शिवाजी मराठा सोसायटी"  पुणे- २ च्या ७/०९/२०२१ रोजीचे नियामक मंडळ सभेमध्ये ठरले प्रमाणे आपली संस्थेच्या विधी महाविद्यालय पुणे २ च्या महाविद्यालय विकास समितीच्या "अध्यक्ष" म्हणून ॲड नथुराम धोंडीबा पाटील (ॲड. एन. डी. पाटील) यांची निवडीबद्दल शुभेच्छा व अभिनंदन. श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे २ चे ऑननरी सेक्रेटरी  जनार्दन ग.थोरात यांच्या स्वाक्षरीसह ॲड.श्री नथुराम धोंडीबा पाटील  यांना  नियुक्त पत्र देण्यात आले.
 यावेळी ॲड.एन डी पाटील यांना पुढील कार्यास  "श्री शिवाजी मराठा सोसायटी" पुणे-२ चे सर्व सन्मानित पदाधिकाऱ्यांकडून दिल्या शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test