Type Here to Get Search Results !

मा केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या आयुष्यातील सहस्त्र शरद पौर्णिमा निमित्ताने "श्री क्षेत्र सोमेश्वर" येथे अभीषेक पुजा.

मा  केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या आयुष्यातील सहस्त्र शरद पौर्णिमा निमित्ताने "श्री क्षेत्र सोमेश्वर"  येथे अभीषेक पुजा.

मा.केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या आयुष्यातील सहस्त्र शरद पौर्णिमा निमित्ताने सोमेश्वर चरणी अभीषेक पुजा : दिर्घायुष्यासाठी प्रार्थना

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे येथे मंगळवार दि.१९ रोजी कोजागिरी/शरद पौर्णिमा आहे. देशाचे नेते,माजी केंद्रीय मंत्री व  पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांचे जीवनातील येणाऱ्या एकूण पौर्णिमा पैकी ८१ व्या वर्षांतील १००० वी "कोजागिरी/शरद पौर्णिमा" आहे. यानिमित्ताने  साहेबांचे अभिष्टचिंतन करून त्यांना  दीर्घायुष्य होवोत व त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्री क्षेत्र  सोमेश्वर शिवलिंग महारुद्र  अभिषेक श्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप नवनिर्वाचित संचालक किसनराव तांबे व संग्राम सोरटे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी पुजारी विनोद  भांडवलकर,पुरोहित ऋषी घोलप व मुकेश भांडवलकर होते.
या वेळी देवस्थान सचिव राहुल भांडवलकर,
कारखाना नवनिर्वाचित संचालक प्रवीण कांबळे,संचालक विशाल गायकवाड,दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर पुणे ट्रस्ट खजिनदार बी एम गायकवाड, तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्या सुचिता साळवे,करंजे मा सरपंच प्रकाश मोकाशी, बाजीराव शिंदे,चौधरवाडी मा .सरपंच यादवराव शिंदे, उपसरपंच तानाजी भापकर,करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड,वाकी सरपंच किसन बोडरे, सदस्य इंद्रजित जगताप,पळशी सरपंच रावसाहेब चोरामले, युवा कार्यकर्ते निखिल शेंडकर, बाळासाहेब चौधरी,अनंत मोकाशी,नितीन शेंडकर, मदन शेंडकर,मोहन भांडवलकर,प्रताप गायकवाड,भाऊसाहेब लकडे,पत्रकार विनोद गोलांडे व मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे आभार श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test