श्री सोमेश्वर चे नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार.
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील नुकतीच श्री सोमेश्वर साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक झालेली असून नवनिर्वाचित संचालक
लक्ष्मण गोफणे व संग्राम सोरटे यांची निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघ (पुणे )व महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय पत्रकार संघ (AIJ)पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे ,बारामती तालुका उपाध्यक्ष विनोद गोलांडे तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष सदाशिव ठोंबरे ,महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महादेव वाघमोडे , राजेंद्र कोळेकर ठोंबरे, कुलदीप ठोंबरे , सुधीर ठोंबरे , नवनाथ बंडगर, दत्ता चोरमले सह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.



