Type Here to Get Search Results !

बारमती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाने तो...फरार आरोपी केला जेरबंद.


बारमती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाने तो...फरार आरोपी केला जेरबंद.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुका पोलीस तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या ५
गुन्हयामधील सराईत आरोपी सुरज उर्फ माउली सोमनाथ काशीद रा मेडद ता बारामती जि पुणे याला बारमती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाने केला जेरबंद -
बारामती तालुका पोलीस तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्हयामधील सराईत आरोपी सुरज उर्फ माउली सोमनाथ काशीद हा गेली ४ महन्यिापासुन फरार होता मा.पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली होती की ,इसम नामे माउली काशीद रा. मेडद ता बारामती जि पुणे हा आज रोजी रात्री त्याचे आई वडीलांना भेटण्यासाठी येणार आहे.त्याप्रमाो मा ढवाण सो यांनी बारामती तालुका पो स्टे चे गुन्हेशोध पथकाला सुचना देवुन त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे गुन्हेशोध पथकाने माउली काशीद याचे मेडद येथिल राहते घराचे कडेला सापळा रचला.पोलीसाची चाहुल लागताच माउली
काशीद याने पळुन जायचा प्रयत्न केला पंरतु गुन्हेशोध पथकाने त्याचा पाठलाग करुन त्याला दि
०५/१०/२०२१ रोजी रात्री १०/00 वा चे सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे तो खलील प्रमाणे
गुन्हयात फरार होता :-
बारामती तालुका पो स्टे
१) गु.रजि.नं २९४/२०२० भा.द.वि कलम ३०७,३४ अ.जा.ज ३(२)(va)
२) गु.रजि.नं २५२/२०२१ भा.द.वि कलम ३२६,३२४,३४
३) गु.रजि.नं ३७६/२०२१ भा.द.वि कलम ३२४,३२३,३४
४) गु.रजि.नं ३९१/२०२० भा.द.वि कलम ३२४,३४
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन
१)गु.रजि.नं२४९/२०२१ भा.द.विकलम १४३,१४७,१४९,४५२,३२४,२६९,२७०३२३,५०४
सदर आरोपीस अटक करुन पुढील कार्यवाही चालु आहे . सदरची कारवाई मा  अभिनव
देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री. मिलींद मोहिते ,उपविभागीय
अधिकारी बारामती विभाग मा गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.महेश ढवाण पोलीस
कॉन्स्टेबल राहुल पांढरे नंदू जाधव, विजय वाघमोडे विनोद लोखंडे,यांनी कामगिरी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test