Type Here to Get Search Results !

प्रादेशिक मनोरुग्णालयात मानसिक आरोग्य दिन साजरा

प्रादेशिक मनोरुग्णालयात मानसिक आरोग्य दिन साजरा
पुणे , जिल्हा न्याय विधी सेवा प्राधिकरण पुणे, सिंबॉयसिस लॉ कॉलेज, पुणे व प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ‘मनोरुग्णांसाठी असणारे कायदे’  आणि ‘मनोरुग्णांसाठी असणाऱ्या विविध शासकिय योजना’ याविषयी माहिती देण्यात आली.
मनोरुग्णालयातील मनोविकरातज्ज्ञ डॉ. योगिता गोसावी यांनी मनोरुग्णांसाठी काम करतांना येणाऱ्या कायदेविषयक अडचणी याविषयी माहिती दिली. रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अभिजीत फडणीस व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत, प्रा. शिरीष कुलकर्णी, डॉ. आशिष देशपांडे, डॉ. गिरीजा महाले यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मनोरुग्णालय काम करणारे मनोविकारतज्ज्ञ, वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, व्यवसायोपचारतज्ज्ञ तसेच समाजसेवा अधिक्षक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test