सोमेश्वरनगर प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाच्या वतीने बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे शनिवार दि २ रोजी मोफत सातबारा चे वाटप कार्यक्रम घेण्यात आला तर १३० खातेदारांना याचा लाभ घेतला असून
पुणे जिल्हा विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड
यांच्या हस्ते वडगाव निंबाळकर मंडलाधिकारी संजय माने यांच्या उपस्थितीत व बारामती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व विजय पाटीलसाहेब तहसीलदार बारामती व यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करंजेगाव तलाठी दादासो आगम यांनी करंजेपुल येथे केले होते ,या कार्यक्रमास कोतवाल तानाजी जाधव व अविनाश पाटोळे यांनी आयोजन केले ,मोफत सातबारा कार्यक्रम शनिवार दि २ पासून ते शनिवार दि ९ पर्यंत चालू असलेली ने सर्व खातेदारांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हाहन आगम यांनी केली.
या प्रसंगी खातेदार ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.



