सोमेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणूक-सभासद संख्या जास्त असल्याने मतदान वेळेमध्ये बदल.
श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर ता.बारामती जि.पुणे या
सहकारी संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन २०२०-२१ ते २०२५-२६ चा
सुधारीत निवडणूक कार्यक्रम दिनांक२०/०९/२०२१ रोजी प्रसिध्द झाला आहे. त्यानुसार दिनांक १२/१०/२०२१ वार मंगळवार रोजी होणा-या मतदानाची वेळ सकाळी ८.०० ते सायं ५.००
वाजेपर्यंत अशी होती परंतु मतदारांची संख्या जास्त असल्याने त्या वेळेमध्ये मा. राज्य सहकारी
निवडणूक प्राधिकरण, महारष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील जा.क्र. रासनिप्रा/कक्ष- ११/सोमेश्वर/ससाका/मतदान वेळ बदल/३०६०/२०२१ दिनांक ०६/१०/२०२१ अन्वये मान्यता घेऊन दिनांक १२/१०/२०२१ वार मंगळवार रोजी होणा-या मतदानाची वेळ सकाळी ७.०० वा. ते सायं ६.०० वा.पर्यंत करण्यात आली आहे याची सर्व सभासद यांनी नोंद घ्यावी.