बारामती तालुक्यामध्ये "राष्ट्रवादी गांव संपर्क अभियान" तर करंजेत श्री सोमेश्वर कारखाना नवनिर्वाचित संचालक यांनी मतधिकांंचे मानले आभार
सोमेश्वरनगर - बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी गांव संपर्क अभियान व
श्री सोमेश्वर सह.सा.कारखाना मतदार आभार दौरा
करंजेपूल-निंबूत जिल्हा परिषद गट
करंजेपुल-निंबूत जिल्हा परिषद गटामधील सर्व मतदार बंधू भगिनींनी व राष्ट्रवादी कार्यकर्ते, ग्रामपंचायत व संस्था, आजी माजी पदाधिकरी व सभासद यांना कळविण्यात येते की, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा
पवार साो, यांचे सुचनेनुसार बारामती तालुक्यामध्ये "राष्ट्रवादी गांव संपर्क अभियान" राबविण्यात गुरुवार दि 11 रोजी सोरटेवाडी, करंजेपूल,चौधरवाडी, करंजे(देऊळवाडी),शेंडकरवाडी,मगरवाडी,वाकी,चोपडज, सस्तेवाडी,होळ, सदोबाचीवाडी
राबवण्यात आले दौरा आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायस समिती पदाधिकारी व सदस्य, संस्था, पक्ष संघटना व सोमेश्वर कारखाना पदाधिकारी दौऱ्यामध्ये सहभागी होते. दौऱ्यामधील विषय १)श्री सोमेश्वर कारखाना निवडणूक मतदार आभार २) नविन बुथ कमिटी स्थापन करणे, ३) पक्ष संघटना
पद निवडीबाबत ४)मतदार नोंदणी अभियान ५) गाव पातळीवरील विविध विकास कामे आढावा व अडी अडचणी ६)कोव्हीड-१९ लसिकरण ७) रस्ते विकास योजना नविन सूची बाबत ८) आगामी जि.प./पं.स. व सहकारी संस्था निवडणूकीबाबत विचार विनिमय करणे.यावर सविस्त चर्चा करण्यात आली, करंजे येथील दौरा प्रसंगी अध्यक्षस्थानी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर होते तर त्यांनी गावकर्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करत पुढील काळात असणाऱ्या विविध मागण्यांचे पूर्तता नक्कीच केली जाईल या दृष्टीनेच हा दौरा अभियान राबविण्यात आला असल्याचेही होळकर यांनी बोलताना सांगितले,
तर नवनिर्वाचित सोमेश्वर कारखना अध्यक्ष पुषोत्तम जगताप यांनी करंजेगाव सभासदा यांनी दिलेल्या उचकी मतधिक्यानी मतदान दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळ च्या वतीने आभार मानले
हा संपर्क दौरा करंजेगावं मारुती मंदिर येथे आयोजन केले होते तर उपस्थित करंजे मान्यवर ग्रामस्थांच्यावतीने नवनिर्वाचित संचालक मंडळांचा सत्कार केला तर शुभेच्छा व अभिनंदन ही करंजे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले .
या वेळी सूत्रसंचालन बुवासाहेब हुंबरे यांनी केले व तर आभार प्रताप गायकवाड व संतोष हुंबरे यांनी मानले