Type Here to Get Search Results !

महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान – भिंताडे

महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान – भिंताडे
पुरंदर प्रतिनिधी – नारी शक्ती जन्मापासूनच वेगवेगळ्या रुपात आपल्यावर संस्कार करत असते.  समाजात वावरताना देखील त्या संस्कारांचा उपयोग आपल्याला नेहमीच होत असतो .त्यामुळे महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुरंदरचे उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी व्यक्त केले.
भिवडी ( ता.पुरंदर ) गणात बाळासाहेब भिंताडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून नुकताच साजरा करण्यात आला.यावेळी कोरोना काळात स्थानिक पातळीवर जोखीम उचलत समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सुपे खुर्द येथील आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविकांना बाळासाहेब भिंताडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष गुणगौरव देखील करण्यात आला.या दरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडूकाका जगताप प्रा.हनुमंतराव झेंडे अमोल नवले ,अतुल जगताप ,सुपे खुर्द ग्रामपंचायत सदस्य सुमित जगताप यांसह हर्षद काटकर, संजय समगीर, विलास आंबूले ,दिलीप चव्हाण,मंजुळा झेंडे, ललिता पोटे, ऋषी तिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश राउत यांनी केले तर उपस्थितांचे आभार तुकाराम जगताप यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test