Type Here to Get Search Results !

बारामती शहर पोलीसांची कारवाई; २१ हुन आदिक घरफोड्या करणारा अट्टल चोर गजाआड !

बारामती शहर पोलीसांची कारवाई; २१ हुन आदिक घरफोड्या करणारा अट्टल चोर गजाआड !
बारामती – पुणे शहरासह जिल्ह्यात 21 हून अधिक घरफोड्या केलेल्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या बारामती शहर पोलिसांनी आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहरात मेडिकलचे शटर उचकटून चोरी करण्याच्या तयारीत असताना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आकाश विठ्ठल पाटोळे या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे.बारामती शहरांमध्ये मेडिकलचे शटर उचकून एक इसम चोरी करत असताना नागरिकांनी त्यास पकडून पोलीस स्टेशनला कळविले. बारामती शहर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. सदर आरोपी हा भिंतीवरून उडी मारून पळून जात असताना खाली पडून जखमी झाला. पोलिसांनी त्याला महिला हॉस्पिटल बारामती येथे उपचार साठी दाखल केले. अधिक चौकशी केली असता सदरच्या चोरट्याने पाटील मेडिकल मोतीबाग बारामती येथे चोरी करण्यात आल्याची कबुली दिली. त्याच्यावर पुणे शहरामध्ये घरफोडीचे 19 गुन्हे दाखल आहेत.

आरोपी आकाश विठ्ठल पाटोळे यांचेकडून रोख 2,100 रुपये तसेच तसेच पुणे शहरातून चोरी केलेली एक पांढरे रंगाची स्कुटी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार अरुण रासकर हे करीत आहेत.
पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, सहा.फौजदार अरुण रासकर, संजय जगदाळे ,पोना. कोळेकर पोकॉ.तुषार चव्हाण,बंडू कोठे,मनोज पवार यांनी ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test