भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये २०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान ;अवयव दान १२२ जणांनी भरले फॉर्म.
वालचंदनगर : वालचंदनगरचे युवक आकाश(वस्ताद) भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व अवयव दान शिबिराचे आयोजन वालचंदनगर ग्रामपंचायत हॉल मध्ये करण्यात आले. दोन्हीही उपक्रमास युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रोटो - सोटो संस्था भारत सरकार यांच्या सहकार्याने अवयव दान चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये २०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले व अवयव दान शिबिरामध्ये १२२ जणांनी फॉर्म भरून दिले. एका वेळी एवढ्या दात्यांनी अवयव दानाचे फॉर्म भरणे हा एक उपक्रम आहे.
या कार्यक्रमास निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील,पिपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे, भिमशक्ती सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शरद चितारे ,इंदापुर अर्बन बॅंक व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील, भाजपचे इंदापूर सोशल मीडिया उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे,संजय नकाते, अमोल बोंद्रे, ,अमोल राजपूत,हणुमंत केंगार, दिपक माने, अक्षय शिंदे,सुयश चोधरी, शशिकांत गेजगे, अनिल बनसोडे,सिद्धार्थ भोसले, विजय चितारे, सागर भोसले, प्रेम देवकाते, ,उदय चितारे, ऋतिक रणपिसे, अविनाश चंदनशिवे, संजय भोसले, किरण जावळे, संतोष कांबळे, औदुंबर झेंडे इत्यादी मान्यवर व सर्व मित्र उपस्थित होते.