वाहनाच्या बॅटरी चोरणारी टोळी जेरबंद.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - मिळालेल्या माहितीनुसार बारामती विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना बुधवार दि २४ रोजी सदर पथकास गोपनिय बातमीदार मार्फ़त माहिती मिळाली की वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या हद्दीत बऱ्याच ठिकाणी बॅटरी चोरी चे गुन्हे घडले असून सदरच्या बॅटरी चोरणारी टोळी ही पणदरे आणि ढाकाळे परिसरात असल्याची खात्री लायक माहिती मिळाली त्यावरून सदर ठिकाणी जाऊन इसम नामे
१) राजेंद्र मारुती जाधव वय २९
२) गणेश वामन जाधव वय ३२
दोघे रा ढाकाळे तसेच
३) संतोष लक्ष्मण भंडलकर वय ३८वर्षे
४) प्रमोद मोहन कोकरे वय ३८ वर्षे याना ताब्यात घेतले आहे . त्याच्याकडे चौकशी केली असता सदरील ४ इसमानी मोरगाव - बारामती रस्त्यालगत पार्किंग केलेल्या ट्रक किंवा अवजड वाहनाच्या बॅटरी चोरल्या असलेचे सांगितले .या बाबत वडगाव निंबाळकर पो स्टे गु र न ४७०/२०२१ भा द वी ३७९ नुसार गुन्हा दाखल आहे. सदरील वरील ४ आरोपी यांनी वरील प्रमाणे अनेक गुन्हे केले असल्याचे सांगत आहेत . सदरील आरोपीताना पुढील तपास कामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. सदरील कारवाई ही मा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख ,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते पोलिस उप अधिक्षक गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके पो उप नि शिवाजी ननवरे ,सहा फो अनिल काळे, पोलीस कर्मचारी रविराज कोकरे ,अजय घुले ,विजय कांचन , अभिजित एकशिंगे , स्वप्नील अहिवळे, धिरज जाधव ,काशिनाथ राजापुरे यांनी केली आहे.