"उन्नती फाऊंडेशन"मुंबई संस्थेच्या वतीने गरजु कुटूंबांना एक हात मदतीचा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर करंजे गाव परिसरात " उन्नती फाऊंडेशन" मुंबई या संस्थेच्या वतीने माळवाडी, करंजे, कोरडेवस्ती येथील गरीब, निराधार व गरजू वयोवृद्ध कुटुंबांना अन्नधान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी या संस्थेचे अध्यक्ष वैभव लोंढे व उपाध्यक्षा योगीता लोंढे यांनी या निराधार कुटुंबियांच्या व्यथा ऐकून घेतल्या व त्यांनी व्यक्त केलेल्या मदतीच्या अपेक्षेसाठी "उन्नती फाऊंडेशन"या संस्थेच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या मदत कार्यात परिसरातील रजनीकांत गायकवाड, शीतल गायकवाड, सायली गायकवाड, प्रा. रोहित बोत्रे व केबल व्यावसायिक प्रशांत जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले आणि अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम व्हावेत व आमचे कायम योगदान राहील असे आश्वासन दिले.



