पिंगोरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन
पुरंदर - पिंगोरी (ता.पुरंदर ) येथे बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे व पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी चंदुकाका जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव गणेश जगताप यांच्या हस्ते उत्साहात पार पडला...
यावेळी पिंगोरी येथील भोसलेवस्ती अंतर्गत संरक्षण भिंत बांधणे तसेच अंतर्गत रस्ता करणे अशा विविध विकास कामांचे उद्घाटन तथा भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कोळविहीरे गावचे विद्यमान् सरपंच महेशजी खैरे निवडणूक समन्वयक अध्यक्ष भाग्यवान मस्के, ओबीसी सेल अध्यक्ष राजेंद्र बरकडे, नीरा कोळविहीरे जिल्हा परिषद युवक काँग्रेस गटाचे अध्यक्ष दत्ताराजे शिंदे , तालुका सरचिटणीस हनुमंत टेकवडे तसेच गणेश थोपटें, नवनाथ चोरमले,ग्रामसेवक अनिल हिरासकर, कैलास गायकवाड , महादेव शिंदे, संतोष शिंदे, राजेंद्र शिंदे, शामराव शिंदे, गोरख शिंदे,खलिप शिंदे, दिलीप शिंदे, लक्ष्मण शिंदे, अनिल भोसले, शंकर शिंदे, आत्माराम शिंदे, मानसिंग शिंदे,रवि शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, हरेश्र्वर शिंदे, निलेश शिंदे, अजय भोसले, रवी धुमाळ, भरत शिंदे, अजित शिंदे, प्रदिप गायकवाड, प्रविण शिंदे, योगेश शिंदे, सतिश शिंदे, अमर गायकवाड, तुषार शिंदे, मयुर शिंदे, ऋषिकेश गायकवाड, अभिषेक जाधव, ओंकार शिंदे,ओंकार सरकाळे, आदित्य शिंदे, संभाजी पवार यांसह आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते ..



