जेजुरी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढणार - विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई
जेजुरी प्रतिनिधी - आगामी काळात येऊ घातलेल्या जेजुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे जेजुरी नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी जेजुरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या व जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून आगामी काळात येऊ घातलेली जेजुरी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे आणि जेजुरी चे जेष्ठ नेते दिलीप बारभाई यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांवर चर्चा केली सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामांचा खरपूस समाचार घेत जेजुरी शहरात झालेल्या अनेक विकास कामांत भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी सांगितले जेजुरी शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असताना नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळतो यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत असुन येथे लाखो भाविक देव दर्शनासाठी व कुलाचार कुलधर्म करण्यासाठी येत असतात परंतु त्यांना शहरात कुठेच मुतारी अथवा शौचालयाची सोय नाही असे असताना देखील स्वच्छतेचा पुरस्कार मिळातो हा मोठा चर्चेचा विषय शहरात रंगला आहे राज्यात जरी आघाडीचे सरकार असले तरी जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस शी युती न करता पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जयदीप बारभाई यांनी सांगितले



