Type Here to Get Search Results !

जवळार्जुन येथे क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

जवळार्जुन येथे क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  
पुरंदर - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून जवळार्जुन ( ता.पुरंदर ) येथील ज्योतिर्लिंग तरुण मंडळ आयोजित “ शाहिद चंद्रकांत टेकवडे स्मृती चषक नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांसह जवळार्जुन गावचे सरपंच सोमनाथ कणसे तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन टेकवडे अशा विविध मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला बक्षिसे तर स्पर्धकांना देखील उत्तेजनार्थ ट्रॉफी व टी शर्टचे वाटप करण्यात आले आहे .
या स्पर्धेत हिस्ट्री मेकर्स रानमळा संघाने प्रथम क्रमांक मिळवत ११ हजारांचा रोख इनाम पटकावला तर व्दितीय क्रमांकासाठी शाहिद चंद्रकांत टेकवडे क्रिकेट क्लब ने बाजी मारत ९ हजार रुपयांचा इनाम हस्तगत केला असून गणेश तरुण मंडळाने तृतीय क्रमांक मिळवत ७ हजारांचा इनाम संपादित केला आहे.
याप्रसंगी ज्ञानेश्वर टेकवडे पोपट टेकवडे गोपीचंद टेकवडे विजय टेकवडे प्रशांत राणे महेश टेकवडे नागेश टेकवडे पोलीस पाटील श्रीकांत राणे किरण टेकवडे आकाश टेकवडे सुजित राणे राजेंद्र टेकवडे संतोष राणे गणेश साळुंखे धनंजय कणसे यांसह पंचक्रोशीतील नामांकित क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय टेकवडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रुपेश टेकवडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test