...पर्यत व्याजासह एकरक्कमी FRP सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग न केल्यास काटा बंद - सतिश काकडे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी -बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.सोमेश्वरनगर कारखान्याचा सन २०२१-२२ चा गाळप हंगाम सुरू होवुन दिड महिना होत आलेला आहे. कायद्या प्रमाणे गाळप झालेल्या उसाला F.R.P रक्कम पुर्ण देणे बंधनकारक आहे. काल झालेल्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मिटींग मध्ये F.R.P एकरक्कमी देणे संबंधी MD व सर्व संचालक मंडळाने आग्रह धरला होता परंतु चेअरमन यांनी तत्परता दाखवली नाही उलट त्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे. वास्तविक सोमेश्वर कारखान्याचे नेट F.R.P रक्कम २८६६/- रू. प्रति मे.टन असुन सदर रक्कम एकरक्कमी सभासदांना मिळाल्यास सभासदांची सोसायट्यांची कर्ज एकरक्कमी भरता येतील व त्यामुळे जिल्हा बँकेच्या बिनव्याजी कर्जाचा त्यांना फायदा घेता येईल तसेच एकरक्कमी रक्कमेमुळे वैयक्तिक कामे सभासदांना पुर्ण करता येतील. दिपावलीनंतर शाळा सुरू होतील त्याची फी, शेतीच्या मशागती, उसाची बांधणी, बी-बियाणे खरेदी व लग्न सराई अशा अनेक गोष्टींना सभासदांना सामोरे जावे लागणार असल्याने त्यांना पैशांची आवश्यकता आहे. तसेच कारखान्याने मागील ३ ते ४ वर्षात उच्चांकी भाव दिला आहे व मागील गळीत हंगामामध्ये तर राज्यात एक नंबरचा भाव दिलेला आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे चेअरमन हे निवडणुकीच्या प्रचारावेळी कारखान्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही कारखान्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे असे सभामधुन वारंवार सांगत होते. मग कालच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये एकरक्कमी F.R.P देणे बाबत निर्णय का घेतला नाही याचे उत्तर चेअरमन यांनी द्यावे, कारखान्यास एकरक्कमी F.R.P रक्कम देण्यास अडचण काय आहे? कारण गेल्या ४ दिवसापुर्वी पुणे जिल्हयातील मा.ना. दिलीपरावजी वळसे पाटील गृहमंत्री यांच्या भिमा शंकर सह. साखर कारखान्याने एक रक्कमी F.R.P जाहीर करून उस दराची कोंडी फोडली आहे.
असे असताना चेअरमन यांना एकरक्कमी F.R.P रक्कम देण्यास अडचण काय? का जाणीवपुर्वक
सभासदांना वेठीस धरावयाचे आहे का? उलट मा.ना. दिलीपरावजी वळसे पाटील यांनी एकरक्कमी F.R.P रक्कम जाहीर करून उसदराची कोंडी फोडली त्याबाबत कृती समितीच्या वतीने त्यांचे जाहीर आभार! तसेच गेली ३ ते ४ वर्षापुवी कारखान्याने सभासदांच्या उसबीलातुन उस दर देण्यासाठी पैसे कमी पडले तर ते देण्यासाठी कमी पडलेली रक्कम किंमत चढउतार निधी २० कोटी रूपये जमा आहे त्यामधुन देखील आपण रक्कम घेवु शकतो. सदर पैसे कारवाना विजयाजी वापश्न आहे. तरी चेअरमन यांना आवाहन करण्यात येते की, ज्या सभासदांचे उस गाळपास आलेले आहेत
त्यांच्या बँक खात्यावर एक आठवड्यात तात्काळ व्याजासह एकरक्कमी F.R.P रक्कम वर्ग करावी.
तरी कारखान्याने F.R.P रक्कम सभासदांच्या बँक खात्यात वर्ग न केल्यास नाईलाजास्तव वेळ प्रसंगी
शेतकरी कृती समितीच्या वतीने काटा बंद आंदोलन करण्यात येईल. काटा बंद आंदोलन करतेवेळी
30 तारीतर केव्हाही काही अनुचीत प्रकार घडल्यास त्यास चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी. तरी ही वेळ चेअरमन यांनी आणुन देवु नये, तात्काळ याची अंमलबजावणी करावी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
चेअरमन म्हणतात राज्यात एक नंबरचा दर दिला, कारखान्यावर कुठलेही कर्ज नाही
मग एकरक्कमी F.R.P रक्कम का देत नाही? निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन तर गेल्या
वर्षीचा भाव बोगस जाहिर केला नाही ना? का अपणास पुन्हा चेअरमन व्हायचे होते म्हणुन
सभासदांना व अजितदादांना थापा तर मारत नव्हता ना? कारखान्यावर कोट्यावधी रूपयांचे
कर्ज नाही ना? सभासदांचे F.R.P देण्यासाठी कपात केलेले २० कोटी रूपये गेले कुठे? याचे उत्तर चेअरमन यांनी द्यावे.
-पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतिश काकडे.