Type Here to Get Search Results !

पद्धमविभूषण शरदचंद्रजी पवार यांचे वाढदिवसानिमित्त "ई श्रमिक कार्ड" नावनोंदणी अभियानाचे आयोजन

पद्धमविभूषण शरदचंद्रजी पवार यांचे वाढदिवसानिमित्त "ई श्रमिक कार्ड" नावनोंदणी अभियानाचे आयोजन
बारामती : पिंपळी-लिमटेक येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण,व्यावसायिक, उद्योजक आणि रोजंदार मजूर-कामगार यांचे शासकीय योजनांतून व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले "ई श्रमकार्ड" मोफत नावनोंदणी चा कार्यक्रम पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात दि.२ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
  सदर योजनेचा लाभ लहान आणि सीमांत शेतकरी-शेतमजूर,पशुपालन करणारे,विडी कामगार,बांधकाम कामगार,सेंट्रिंग कामगार,लेदर कामगार,सुतार,वीटभट्टीवर काम करणारे,न्हावी,घरगुती कामगार,भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेते,वृत्तपत्र विक्रेते,हातगाडी ओढणारे,ऑटो रिक्षा चालक,घरकाम करणारे कामगार,आशा कामगार,दूध उत्पादक शेतकरी,सामान्य सेवा केंद्रचालक,स्थलांतरित कामगार, टेलरिंग व्यवसाय करणारे,किराणा दुकानदार आदींसह असंख्य व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक यू.ए.एन.(एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे "इ श्रम  कार्ड" आधारकार्ड सारखे कार्ड,देण्यात येणार आहे.ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास फायदा होणार आहे.
   यामध्ये दोन लाखांपर्यंत मोफत अपघाती विमा, घर बांधण्यासाठी आर्थिक मदत,वीज बिलात सबसिडी,सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.
ई श्रम नोंदणी साठी काही निकष देखील लावण्यात आले आहेत. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी,ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी, ती व्यक्ती ईपीएफओ व ईएसआयसी ची नसावी इत्यादी नियम अटी आहेत. ई श्रम नोंदणीसाठी प्रामुख्याने,आधार कार्ड आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर,राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक आवश्यक आहे. नावनोंदणी मोफत असून कार्डसाठी नाम मात्र क्षुल्लक ठेवले आहे.
या "ई श्रम कार्ड" नोंदणी अभियानासाठी भरपूर प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत वेगवेगळ्या व्यवसाया नुसार एकशे पाच नागरिकांची नवनोंदनी झाली असून उर्वरीत नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार दि.६ डिसेंबर रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ठेवण्यात आले असून लिमटेक मधील नागरिकांसाठी गुरुवार व शुक्रवार दि.९ व १० डिसेंबर रोजी लिमटेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ठेवण्यात आले असल्याची माहिती छत्रपती कारखाना भवानीनगर चे संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी सांगितले. तसेच गरजू लोकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
      सदर उपक्रमाचे आयोजन संचालक संतोषराव ढवाण पाटील,सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे, हरिभाऊ केसकर, अशोकराव ढवाण पाटील आदींनी केले.
       ऑनलाईन नावनोंदनी चे कामकाज गणेश सी.एस.सी. सेंटर भवानीनगर च्या वतीने आदित्य पाटोळे,गणेश गुप्ते आदींनी केली.
           यावेळी संचालक संतोषराव ढवाण पाटील, सरपंच मंगल केसकर, उपसरपंच राहुल बनकर,तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते, अजित थोरात,तसेच अशोकराव ढवाण पाटील,हरिभाऊ केसकर,पप्पू टेंबरे,खंडू खिलारे आदींसह नोंदणी करण्यासाठी आलेले युवक, शेतकरी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test