सोमेश्वरनगर प्रतिनिधी - सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात असून मका, ज्वारी ,गहू ,कांद्या पिकाची पेरणी झाली असून. ज्वारी पोटरण्याच्या अवस्थेत आली आहे. गहू,ज्वारी देखील वाढीला लागलेला आहे. अशा अवस्थेत वातावरण मात्र, सातत्याने बदलत आहे. ढगाळ वातावरण सातत्याने राहत असल्याने हरभरा,मका,गहू तर ज्वारी पिकावर थोड्या दिवसात रोग किंव्हा अळीचा प्रादुर्भाव होणार असल्याचे शेतकरी नितीन शेंडकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरातील मगरवाडी,वाकी,चोपडज,करंजे,करंजेपुल,रासकरळा, बुधवारी रात्री सुमारास तर गुरुवार सकाळ पर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत रब्बी पिकांना संकटात टाकले आहे. त्यामुळे गहू, ज्वारीसह तूर ,कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.तर ते पूर्ण जोपालेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान खात्याने चार तारखे पर्यंत मुसळधार पाऊसही सांगितला आहे.
ढगाळ वातावरण राहत असल्याने दिवसभर या गावातून अंधारून वातावरण निर्माण झाले आहे.बुधवार दि 1 पासून सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही भागात अंधारून आले होते. दिवसभर ढगाळ कायम राहिले. सायंकाळी काळेकुट्ट ढग जमा होऊन सात वाजता काही जिल्ह्यांतील भागात जोरदार पाऊस झाला.दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने सर्वत्र पाणीच झाले.तर रत्यालत खड्डे मध्ये पाणी साचलेले दिसून येत आहे.पाऊस काही वेळ थांबल्यानंतर पुन्हा रात्री च्या दरम्यान, पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर अधिक होता. ग्रामीण भागातदेखील पावसाचा जोर राहिला. या पावसामुळे काही प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाचा जोर अधिक असल्याने काही वेळातच रस्त्यांवरून पाणी वाहू लागले.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
या वर्षी रब्बी पीक घेतलेले असून ते जोमात आले होते परंतु झालेल्या अवकाळी पावसामुळे माझी दोन महिन्यांची मका व ज्वारी पूर्ण झोपलेली आहे,झालेला अवकाळी पाऊस थांबला नाही तर पिकाचे पूर्ण नुकसान होण्याची भीती व खर्चही वाया जाणार असल्याने खंत वाटत आहे.
शेतकरी-नितीन शेंडकर सोमेश्वरनगर