सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
"देशाचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना विनम्र अभिवादन. सरदार वल्लभभाईं खऱ्या अर्थानं पोलादी व्यक्तिमत्वं होतं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अल्पावधीत शेकडो संस्थानं भारतात विलीन करुन त्यांनी अखंड, मजबूत, एकसंध भारताची निर्मिती केली. सरदार वल्लभभाईंनी घडवलेल्या आपल्या देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखूया. सरदार वल्लभभाईंच्या स्वप्नातील मजबूत भारत घडवूया. भारतरत्न सरदार वल्लभभाईंना विनम्र अभिवादन..."