सोमेश्वरनगर - मार्गशीर्ष महिन्याला खूप पवित्र मानले जाते. या महिन्याच अनेक सण येतात. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या वेळी दत्त जयंती 18 डिसेंबर शनिवार म्हणजे आज आहे. दत्त हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. दत्त जयंती सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दत्त जयंती साध्या पध्दतीने साजरी केली जात होती. मात्र, यावेळी कोरोनाचे नियम पाळून दत्त जयंती उत्साहात सोमेश्वर-करंजे येथे साजरी केली आहे.
बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे नजीक असणाऱ्या दत्त मंदिर येथे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे दत्त जयंती साजरी केली जात नव्हती. पण यावेळी मात्र जगावर असणारे कोरोनाचे संकट दूर होत असल्याने शासनाने महाराष्ट्रातील सर्वच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. असे असताना कोरोना नियमांचे पालन करून करंजे येथील दत्त जयंती उत्सवात साजरी झाली.
सकाळी मुर्ती अभिषेक व महापूजा नंदुकाका त्यांच्या पत्नी मंदाकिनी काकडे -देशमुख यांच्या शुभ हस्ते पुरोहित प्रभाकर बोकील यांच्या उपस्थितीत पुज्या केला , सायंकाळी दत्त जन्म निमित्त महिला वर्गानी पाळणा गीत म्हणत या उत्साहाची संगता केली.तर यावेळी महाप्रसदाचे ही आयोजन केले होते तसेच दत्त मंदिर व मूर्ती आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती ,मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व दिवे-पंती करण्यात आली होती.
या सोहळा प्रसंगी बारामती मा पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब गायकवाड, भगवान भगत, बाळासाहेब गायकवाड, भाऊसो मोकाशी,संजय गोलांडे, लक्ष्मण गायकवाड,रमेश ननावरे,घोंगडे पाटील, सचिन क्षीरसागर ,सचिन मोकाशी,प्रशांत जाधव,अभिजित गायकवाड ,संतोष गायकवाड सह ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमेश्वर पंचक्रोशी भागातून दत्त दर्शन घेण्यासाठी भाविक आले होते.