माळवाडी-करंजे येथे जागतिक मृदा दिन संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील माळवाडी-करंजे येथे रविवार दि ५ रोजी जागतिक मृदा दिनानिमित्त मा. मंडळ कृषी अधिकारी मोरे , कृषि पर्यवेक्षक जगताप, माने साहेब व सावंत साहेब आणि करंजे उपसरपंच बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी कृतीशाळा आयोजित करण्यात आली माळवाडी-करंजे येथील सावता माळी शेतकरी गटातील सर्व सदस्य व माळवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते , यावेळी मोरे यांनी माती परीक्षण फायदे खत नियोजन व विविध शासकीय योजना यांची माहिती सर्व ग्रामस्थ शेतकरी गटातील सदस्यांना सांगितले तसेच प्रत्यक्ष हरभरा पिकाला भेट देऊन हरभऱ्यावरील होणाऱ्या घाट आळीचे निर्मूलन कसे करावे व सापळे कसे लावावे याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कृषी विभागामार्फत देण्यात आलेल्या विविध निष्ठाची मात्रा कशी द्यावी बीज प्रक्रिया कशी करावी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपस्थित शेतकरी बधवांनीही या कार्यक्रमास प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले
या कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी पर्यवेक्षक वडगाव निंबाळकर चंद्रशेखर जगताप यांनी तर माती नुमाने घेण्या बाबत मार्गदर्शन प्रवीण माने कृषी पर्यवेक्षक वडगाव निंबाळकर यांनी केले.