ग्रामपंचायत करंजेपुल यांना ओझोन घंटागाडी भेट
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे बारामतीतील तीन ग्रामपंचायत करंजेपुल, वाघळवाडी आणि निरावगज यांच्या ओझोन घंटागाडी लोकार्पण सोहळा सोमवार दि ६ रोजी संपन्न झाला असून करंजेपुलसाठी सरपंच वैभव गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांतुन पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रमोद काकडे यांच्या सौजन्याने ग्रामपंचायत करंजेपुल यांना केंद्र पुरस्कृत १५ वा वित्त आयोग जि. प. स्तर सन २०२०-२१ अंतर्गत ओझोन घंटागाडी देण्यात आली.
या चारचाकी गाडीचा लोकार्पण सोहळा प्रसंगी सोमेश्वर कारखाना संचालक लक्ष्मण गोफणे ,अभिजित काकडे,प्रवीण कांबळे यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी करंजेपुल उपसरपंच निलेश गायकवाड, मा. सरपंच आप्पासाहेब गायकवाड, करंजे सोसायटी माजी चेरमन कैलास मगर, सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे, माजी सैनिक नितीन शेंडकर व ग्रामस्थ मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व परिसर स्वच्छ रहावा यासाठी सर्वांनी घंटागाडीचा उपयोग करण्याचे आवाहन याप्रसंगी सरपंच वैभव गायकवाड व ग्रामसेविका सुजाता आगवणे यांनी केले.