उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली
बारामती येथील विकासकामांची पाहणी
बारामती दि.२ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
श्री. पवार यांनी आज मौजे कन्हेरी येथील कृषी रोपवाटीका, शिवसृष्टीची जागा आणि रस्त्याची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर बारामती शहरातील विविध भागातील रस्त्याच्या कामाची पाहणी करून पशुसंवर्धन दवाखाना जळोची येथील सुरू असलेल्या कामांबाबत माहिती घेतली. तसेच काराटी येथील विकासकामांची पाहणीदेखील श्री.पवार यांनी केली.
यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.