...त्या गावातील, सुमारे २५ युवकांवर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भरवल्या होत्या  विनापरवानगी बैलगाडा शर्यती.
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे बैलगाडा शर्यतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचा तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी वाघळवाडी येथील सुमारे २५ युवकांवर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          सविस्तर माहिती अशी की, दि.१२ रोजी सकाळी १० वा. वाघळवाडी गावच्या हद्दीत शेतजमिन गट नं 28 लगत असलेल्या उत्तरेकडील शेतजमिनीत बैलगाडा शर्यतीकरीता  उत्तर दक्षिण  अंदाजे असे अंदाजे  200 मीटर लांबीचे 4 फुटी असे मैदान तयार करुन त्यामध्ये आरोपी यांनी मा सर्वोच्च न्यायालयाचे बैलगाडा शर्यत आयोजनाबाबत मार्गदर्शक सुचनांचा तसेच मा  जिल्हाधिकारी सो पुणे यांचे आदेशाचा अवमाऩ करुन विनापरवानगी बैलगाडी शर्यत आयोजन करुन  विनापरवानगी  बैलगाडा शर्यतीचे आयोजन करुन आप आपसांमध्ये कोणतेही मास्क न  वापरता तसेच कोणतेही सरक्षित अंतर न राखता कोविड 19अनुरुप  वर्तनाचे पालन न करता कोरोना विषाणुच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचे वाढत्या प्रादुरभावास कारणी भुत ठरेल अशी हयगयीची तसेच नागरीकांच्या आरोग्यास  धोकादायक ठरेल अशी कृती  केली म्हणुन पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली  त्यावरून १) अजय तात्याबा सावंत 2)जालीदंर शकर अनपट 3) शुभम उर्फ बाबु जाधव  पुर्ण नाव माहीत नाही  4)रुत्विक उर्फ बापु सावंत पुर्ण नाव माहीत नाही 5) महादेव सकुंडे  पुर्ण नाव माहीत नाही 6)विकी सावंत पुर्ण नाव माहीत नाही 7)सुहास गोरख जाधव  8)प्रणव उर्फ  मोन्या बापुराव सावंत 9) सवाणे पुर्ण नाव माहीत नाही  अ नं 1 ते 9 सर्व रा  वाघऴवाडी ता बारामती जि पुणे १०) जगताप पुर्ण नाव माहीत नाही रा मऴशी वाणेवाडी ता बारामती व इतर 10 ते 15 अनोळखी इसम यांच्यावर वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो हवा नागटिऴक करीत आहेत.


  

