PDCC ; पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे 
 बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निर्विवाद विजय मिळवला आहे.  बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांनी दिगंबर दुर्गाडे यांना यर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांना संधी दिली आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ पैकी १६  जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने या बँकेवर वर्चस्व निर्माण केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदासाठी संभाजी होळकर,अशोक पवार, विकास दांगट व दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाची चर्चा परिसरात चांगली रंगलेली होती. परंतु बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांनी दिगंबर दुर्गाडे यांना तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांना संधी दिली आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली तरी एका जागेवर मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.  प्रचार सभेचे वेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचे आवाहनही त्यांनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला. सुरेश घुले यांच्या विजयासाठी स्वतः अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. 


  

