निमगाव केतकीत ग्रामस्थ व भोंग प्रतिष्ठान यांच्या वतीने गुणगौरव व सत्कार समारंभ संपन्न होणारनिमगाव केतकी प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ,
निमगाव केतकी या ठिकाणी रविवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी निमगाव केतकी ग्रामस्थ व भोंग प्रतिष्ठान यांच्यावतीने भोंग परिवारातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व यश संपादन करणाऱ्या लोकांचा गुण गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विजय उत्तम भोंग यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीरबद्दल तर मीना दीपक भोंग यांची उपसरपंच ग्रामपंचायत निमगाव केतकी, मच्छिंद्र महादेव भोंग उपसरपंच ग्रामपंचायत शेळगाव, भारत भोंग युवक प्रदेश सचिव ओबीसी, सुधाकर भोंग हिंदी भाषा रत्न पुरस्कार, प्रशांत भोंग व्हाईस चेअरमन, श्रेयशी सतीश भोंग नवोदयासाठी निवड, वर्षा हनुमंत भोंग सेट परीक्षा उत्तीर्ण, अश्विनी दत्तात्रय भोंग सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल यांचा गुणगौरव होणार आहे. शालनताई भोंग ज्ञानदेव भोंग, अंकुश (दादा) जाधव, देवराज (भाऊ) जाधव, दशरथ (तात्या) डोंगरे, दत्तात्रय (भाऊ) शेंडे, मच्छिंद्र (आप्पा) चांदणे, तात्यासाहेब वडापुरे, डॉ.गौतम भोंग, संदीप भोंग यांच्या हस्ते संत सावतामाळी मंगल कार्यालय निमगाव केतकी या ठिकाणी सायंकाळी 5: 30 मिनिटांनी होणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू भोंग यांनी दिली.