सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील ज्ञानेश्वर फाळके यांचे सेट परीक्षेत यश
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील ज्ञानेश्वर फाळके यांनी गणित या विषयातून सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता (सेट) परीक्षेत यश संपादन केले आहे.
सामान्य कुटुंबातील ज्ञानेश्वर फाळके यांनी अतिशय कठीण परिस्थितीत हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल श्री सोमेश्वर शिक्षण प्रसासरक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय बनसोडे सह सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले.