रुपेश हे पोलीस कर्मचारी आहेत.त्यांचे लिव्हर खराब झाले होते. त्यांना तातडीने लिव्हर ची गरज होती.पण कुठेच लिव्हर मिळाले नाही.तेव्हा त्यांच्या धाडसी बहिणीने स्वतः चे लिव्हर त्यांना देऊन भावाचे प्राण वाचवले.मालन चव्हाण या भादे या गावी ग्रामपंचायत सदस्या आहेत. दि.२ फेब्रुवारी रोजी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल मधे त्यांचे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले.
इतर सर्व भगिनींपुढे या महीले ने एक आदर्श ठेवला आहे .या तिच्या धाडसाबद्दल तिचे सोमेश्वर नगर परिसरासह सर्वत्रच कौतुक आहे.