शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका सचिव हनुमंत नाना पवार यांचे दुःखद निधन
निमगाव केतकी प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - सोमवार दि 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजता हनुमंत नाना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे पवार नाना हे शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते ते सतत शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत होते काल सकाळी ते स्वतः मोटर सायकल घेऊन अकलूज या ठिकाणी खासगी हॉस्पिटलमध्ये रेगुलर चा उपचार घेऊन आले परंतु रात्री साडेदहा वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यामध्ये त्यांचे निधन झाले त्यांच्या जाण्याने शेतकरी वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे नाना यांचे गावांमध्ये महेश स्प्रिंग मोटर नावाने गॅरेज प्रसिद्ध होते पवार नाना म्हणून गावामध्ये ते प्रसिद्ध होते नानांच्या पत्नी कमल हनुमंत पवार माजी ग्रामपंचायत सदस्य होत्या लहान मुले असोत वा मोठी माणसं असोत त्यांना ते अतिशय आदराने सतत हसून बोलत असायचे लहान मुले त्यांना अण्णा या नावाने हाक मारत असत त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी एक मुलगी दोन मुलं व चार नातवंडे असा परिवार आहे