Type Here to Get Search Results !

पुणे ! व्यवसाय कराचे प्रलंबित विवरणपत्र 31 मार्चपर्यंत दाखल करण्याचे आवाहन

पुणे ! व्यवसाय कराचे प्रलंबित विवरणपत्र 31 मार्चपर्यंत दाखल करण्याचे आवाहन
पुणे :  व्यवसाय कर डिसेंबर २०२१ पर्यंत न भरलेल्या जिल्ह्यातील नोंदणीधारक व्यापारी, मालक व आस्थापनांनी कर आणि व्याजासह प्रलंबित विवरणपत्र 31 मार्च 2022 पर्यंत दाखल केल्यास त्यासाठीचे संपूर्ण विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे, असे व्यवसाय कर विभागाने कळवले आहे. 

करदात्यांनी व्यवसाय कराचा भरणा व विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीनेच दाखल करावे. याकरीता www.mahagst.gov.in संकेतस्थळ अथवा ‘MAHAPT’ मोबाईल ॲपचा वापर करावा. करभरणा करताना अडचणी असल्यास राज्यकर सहआयुक्त (व्यवसायकर) वस्तू व सेवा कर भवन, तळमजला, विमानतळ मार्ग, येरवडा, पुणे-411006 (दूरध्वनी क्रमांक 020-26609329/31) या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन राज्यकर सहआयुक्त रामदास शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test