सोमेश्वरनगर ! श्री शिवछत्रपती विविध कार्यकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी अजिंक्य हनुमंतराव सावंत तर उपाध्यक्षपदी शिवाजी खशाबा सकुंडे यांची बिनविरोध निवड.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील श्री शिवछत्रपती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वाघळवाडी अध्यक्षपदी अजिंक्य हनुमंतराव सावंत तर उपाध्यक्षपदी . शिवाजी खशाबा सकुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर सोसायटीच्या संचालक पदी श्री. अंकुश नारायण सावंत,.दत्ता नारायण सावंत,.आनंदराव पांडुरंग सावंत,.चैतन्य हनुमंतराव सावंत,.प्रभाकर अर्जुन कांबळे.बापूराव अकोबा जाधव,श्रीमती.रोहिणी हनुमंतराव सावंत.यामिनी अंकुश सावंत व भारती दत्तात्रय सावंत यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी संस्थेचे संस्थापक स्व.हनुमंतराव सावंत यांना आदरांजली वाहण्यात आली.त्यानंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालक मंडळ, सचिव कल्याण तावरे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून.गायकवाड यांनी काम पाहिले. सहायक निबंधक मिलिंद टांगसाळे यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले तसेच सोसायटीच्या वतीनेही टांगसाळे साहेबांचा सत्कार करण्यात आला
सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन शेतकरी हिताचे निर्णय, शेतकऱ्यांसाठी असलेल्या सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे व पात्र लाभधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे अधीकाधीक मार्गी लावणार असल्याचे सोसायटीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अजिंक्य हनुमंतराव सावंत यांनी सांगितले.