Type Here to Get Search Results !

सुपा ! सुप्यात बँक अधिकाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल


सुपा ! सुप्यात बँक अधिकाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुपे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यायाला मार्चअखेर असल्याने थकीत कर्जाची नोटीस बजावल्याच्या कारणावरून बँकेतच मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी (दि. २९) ) दुपारी बँकेच्या शाखेत घडला. अभिनय उर्फ
काका कुतवळ यांच्या विरोधात पोलिसांनी याप्रकरणी गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल
केला. दत्तात्रय पाडूंरंग कदम (रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) यांनी याबाबत फिर्याद
दिली. कदम यांनी कुतवळ यांचे नातलग सागर अरविंद कुतवळ (रा. कुतवळवाडी, ता.
बारामती) यांना सोनेतारण थकीत कर्ज प्रकरणी २९ रोजी नोटीस बजावण्यासाठी मोरगाव
येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना त्यांना कुतवळ यांनी फोन करत काहीही कारण
नसताना शिविगाळ केली. तुम्ही शिविगाळ का करता अशी विचारणा फिर्यादीने केली
असताना त्यांनी तु बँकेत ये, तुझ्याकडे बघतो असे म्हणत फोन ठेवून दिला. दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादी बँकेत आले. त्यांनी कर्ज विभागात काम करून अकाऊंट विभागात ते जात असताना सव्वा वाजण्याच्या सुमारास कुतवळ हे तेथे आले.
त्यांनी काही एक न विचारता शिविगाळ केली. हाताने मारहाण करत हाताची बोटे पिरगाळत
खुर्चीवर ढकलून दिले. फिर्यादी खाली पडल्यानंतर खुर्चीने मारहाण सुरु केली. त्यात
फिर्यादीच्या हाताची करंगळी फॅक्चर झाली. बँकेतील कर्मचारी हनुमंत किसन भगत, सुरेश
रामचंद्र गायकवाड यांनी भांडण सोडवले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल वरिष्ठांना कल्पना
दिली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचाराची यादी
दिली. त्यानुसार होळ प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी उपचार घेतल्यानंतर फिर्याद दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test