Type Here to Get Search Results !

इंदापूर ! जपान येथे होणाऱ्या स्प्रिंग स्कुल साठी आय कॉलेज, इंदापूर मधील भौतिकशास्त्र विभागातील ७ संशोधक विद्यार्थ्यांची निवड

इंदापूर ! जपान येथे होणाऱ्या स्प्रिंग स्कुल साठी आय कॉलेज, इंदापूर मधील भौतिकशास्त्र विभागातील ७ संशोधक विद्यार्थ्यांची निवड
इंदापूर  - इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य   महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील ७ विद्यार्थ्यांची जपान येथील टोकुशिमा विद्यापीठाद्वारे दिनांक ७ ते १७ मार्च या कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्प्रिंग स्कुल साठी निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील  यांनी निवड झालेल्या सर्व नवोदित संशोधक विद्यार्थ्यांचा सन्मान करून अनेक शुभाशीर्वाद दिले.
   या प्रसंगी ते बोलताना म्हणाले, की जगातील एकूण  २२ देशांमधून ६० विध्यार्थ्यांची या स्प्रिंग स्कुल साठी निवड झालेली आहे.  त्यामध्ये इंदापूर सारख्या ग्रामीण भागातील कॉलेजमधून ७ विध्यार्थ्यांची निवड होणे हे खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. या पुढील काळात संस्थेच्या व महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात भर टाकणारा महाविद्यालायतील संशोधक विभागाची अधिकाधिक प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  स्प्रिंग स्कूल साठी निवड झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि जपान येथील टोकुशिमा युनिव्हर्सिटीचे  डॉ. पंकज कोइनकर यांचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले.
  स्प्रिंग स्कुल साठी निवड झालेले नवोदित युवा संशोधक चि. विक्रांत लाळगे, चि. मयूर राऊत, कु. गौरी कानगुडे, सौ. आयेशा देशमुख, चि. रोहित शितोळे, श्री. अनिकेत हेगडे, श्री. रोहित लोंढे या सर्वांवर महाविद्यालय व परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित संस्थेचे सहसचिव श बाळासाहेब खटके, ऍडवोकेट मनोहर चौधरी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी निवड झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
  कार्यक्रमाप्रसंगी कला शाखेचे प्रमुख डॉ. भिमाजी भोर, विज्ञान विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. शिवाजी वीर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड तसेच इतर प्राध्यापक व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test