बारामती ! कृषी विभागामार्फत बारामती उपविभागात राबविण्यात आलेल्या ऊस पाचट व्यवस्थापन अभियाना अंतर्गत पाचट व्यवस्थापन केलेल्या काटेवाडी येथील प्लॉटला केंद्रीय कृषिमंत्री मा.खा. शरदचंद्रजी पवार यांची भेट.
बारामती - महाराष्ट्र शासन, कृषी विभागामार्फत बारामती उपविभागात राबविण्यात आलेल्या ऊस पाचट व्यवस्थापन अभियाना अंतर्गत पाचट व्यवस्थापन केलेल्या काटेवाडी ता. बारामती येथील प्लॉटला देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नुकतीच भेट दिली. ऊस पाचट व्यवस्थापन अभियानाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. वैभव तांबे उपविभागीय कृषी अधिकारी बारामती यांनी ऊस पाचट व्यवस्थापन अभियानाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी बारामती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सदाशिवबापू सातव, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषी पर्यवेक्षक खोमणे,कृषि सहाय्यक बाजीराव कोळेकर , पोंद्कुले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.