सोमेश्वरनगर ! सोमेश्वर कारखान्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची अचानक भेट.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखानाला मंगळवारी दि २२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांची कारखान्याला अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान करखाना डिस्टलरी,सहवीजनिर्मिती प्रकल्प, साखर कारखान्याची विस्तारवाढ याची
पवार यांनी पाहणी केली.
यावेळी सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी राजेंद्र यादव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर,
संचालक राजवर्धन शिंदे, अभिजित काकडे,संग्राम सोरटे,ऋषिकेश गायकवाड, प्रवीण कांबळे,अजय कदम, लक्ष्मण गोफने, सुनील भगत, जितेंद्र निगडे, प्रणिता खोमणे ,अनंत तांबे, किसन तांबे, हरिभाऊभोंडवे, रणजित मोरे, सचिव कालिदास निकम, दीपक निंबाळकर, योगीराज नांदखिले,
आदी मान्यवर उपस्थित होते.
सोमेश्वर कारखाना येथील जिजाऊ सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान खा. शरद पवार यांनी कारखान्यावर सध्या किती कर्ज, डिस्टीलरी उत्पादन, कारखान्याची गाळप परिस्थीती याबाबत माहीती घेतली.