इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत तिसरा पॅनल होणार का? मतदारांमध्ये उत्सुकता
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पत संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून दिनांक २५ मार्च २०२२ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली असून १०५ च्या आसपास उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून त्यापैकी जवळपास १५ ते २० उमेदवार आमच्या संपर्कात असून त्यांच्या मालकाने अर्ज माघारी घ्या असा दबाव आणला तरी अर्ज माघार घेणार नाहीत. व तिसऱ्या पॅनलच्या तयारीत आहेत. अशी माहिती संतोष मोहिते गुरुजी यांनी दिली. एका उमेदवारांमागे जवळपास दीड ते दोन लाख रुपये निवडणूक खर्च येणार असून २१ उमेदवारांना जवळपास ५० लाख पर्यंत खर्च येणार आहे. परंतु
मोहिते गुरुजी यांनी झिरो बजेट इलेक्शन ही संकल्पना उमेदवारांना पटवून दिली. त्यामुळे तिसऱ्या पॅनलची उमेदवारांनी तयारी दर्शवली.
तिसऱ्या पॅनल ची घोषणा १२ एप्रिल २०२२ रोजी करण्यात येईल. अशी माहिती तिसर्या आघाडीचे पॅनल प्रमुख संतोष मोहिते गुरुजी यांनी दिली.