जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांनी मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरू नये- शकील भाई सय्यद
इंदापुर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - मुस्लिम समाजाविषयी निष्क्रिय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी केला जाहीर निषेध
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल एका सभेमध्ये भाजपा मुस्लिम विरोधी असल्याचे मत व्यक्त केले होते. भाजपा शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी आज त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून जातीपातीचे राजकारण करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरू नये असे मत व्यक्त केले.
शकीलभाई सय्यद म्हणाले की,' तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी 2014 मध्ये न मागता भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता तर तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करता त्यांनी पहाटेच्या शपथविधी वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शपथ घेतली होती. हे तुम्ही का विसरता.
सबका साथ सबका विकास या तत्त्वाप्रमाणे भाजपा आपले कार्य करीत असून सर्व योजना सर्वांपर्यंत पोचविण्याचे कार्य भाजपाच्यावतीने होत आहे म्हणूनच देशात भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये यश मिळत असून भारतीयत्वाला पक्षातर्फे प्राधान्य दिले जाते.
गेल्या सात वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यात कोण जातीपातीचे राजकारण करीत आहे ते सुज्ञ नागरिकांना माहित आहे. गेल्या सात वर्षात किती मुस्लिम तरुणांना तुम्ही रोजगार दिला, नोकरी दिली तेही त्यांनी सांगावे. मुस्लिम समाजाविषयी गैरसमज निर्माण करून हिंदू-मुस्लीम ऐक्य यामध्ये तुम्ही विष कालवण्याचे काम करीत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तुमच्या मंत्र्याचे दाऊदशी संबंध जोडले गेले आहेत.
माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सर्व सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने तसेच पदाधिकारी निवडीमध्ये मुस्लिम समाजाला महत्त्वाचे स्थान आहे.
तुम्ही अनेक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख करता हे कशाचे द्योतक आहे हे त्यांनी सांगावे.