सुप्रिया राजगुरू यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)पदी निवड झाल्याबद्दल देवराज (भाऊ) जाधव यांच्या वतीने सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - निमगाव केतकी तालुका इंदापुर या ठिकाणचे असणारे शेतकरी विठ्ठल राजगुरू यांची मुलगी सुप्रिया राजगुरू यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. त्याबद्दल तिचा सत्कार इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन देवराज (भाऊ) जाधव यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी एका अतिशय प्रामाणिक व कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून आपण आपले व आपल्या तालुक्याची शान वाढवावी. आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेसाठी सर्वांना सोबत घेऊन आपण काम करावे. या वाक्यात त्यांनी सुप्रिया राजगुरू हिला शुभेच्छा दिल्या. यावेळी बालाजी पतसंस्थेचे चेअरमन तात्यासाहेब वडापुरे यांनी देखील सत्कार केला. यावेळी सुप्रिया चे आई वडील सिद्धिविनायक पतसंस्थेचे चेअरमन तुषार (बाबा)जाधव, ग्रामपंचायत सदस्य दादाराम शेंडे, सावता परिषद प्रदेश संघटक संतोष राजगुरू, बाळासाहेब शेंडे,महादेव पाटील, मच्छिंद्र आदलिंग, नंदु चकोर,वैभव मोरे,नंदु गोरे,कोकणे गुरूजी,सुनिल शिंदे,संजय शेंडे व गावातील इतर नागरिक उपस्थित होते