पुणे ! वनवणवा नियंत्रण व जैवविविधता जनजागृतीला गावागावात उत्स्फुर्त प्रतिसाद
शाळकरी मुलांसोबतच जेष्ठ नागरिकदेखील घेताहेत माहिती
पुणे दि.७- जिल्हा माहिती कार्यालय पुणे मार्फत जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ आणि माहितीपटाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. दौंड, इंदापुर, बारामती, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव,भोर व वेल्हे तालुक्यात नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जात आहे. गावागावात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावातील शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच जेष्ठ नागरिकदेखील उत्सुकतेने माहिती घेत आहेत.
चित्ररथ आणि एलईडी वाहन जिल्ह्यातील वनक्षेत्र अधिक असलेल्या गावातून फिरविण्यात येत आहे. वनसंवर्धनाबाबत विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहे. आपली झाडे-एक वनसंपदा, जैवविविधता-अलंकार महाराष्ट्राचा, जैवविविधता पूरक गाव, वनवणवा नियंत्रण, मानव आणि वन्यजीव संघर्ष अशा चित्रफीतींच्या माध्यमातून वनसंपदेचे महत्व सांगण्यासोबतच नागरिकांनी काय काळजी घेतली पाहीजे याबाबत माहिती देण्यात येत आहे.
वेल्हे तालुक्यातील चऱ्हाटवाडी, वांजळे, जाधववाडी तसेच भोर तालुक्यातील कुंबळे तसेच भोर तालुक्यातील केळवडे,कुंबळे गावात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.