कचरा व्यवस्थापन करण्यासाठी १२०लिटर आकारमानाच्या डस्टबिन यांच्या शुभहस्ते प्रदान
बारामती - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,पुणे जिल्हा परिषदेच्या आदर्श जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे (लाखे)यांच्या जिल्हा परिषद निधीतून माळेगाव पनदरे जिल्हा परिषद गटांमधील ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय,पोस्ट ऑफिस,महिला अस्मिता भवन,बँका, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,कारखाना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा,पोलीस स्टेशन, तलाठी व सर्कल कार्यालय, तसेच इतर सहकारी संस्था,सरकारी कार्यालय, मंदिर, मस्जिद व इतर वर्दळीच्या ठिकाणी चा कचरा व्यवस्थापन करण्यासाठी १२०लिटर आकारमानाच्या नीलकमल या नामांकित ब्रँडच्या डस्टबिन जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आल्या. यावेळी पंनदरे ग्रामपंचायातीला जिल्हा परिषद निधीतून कचरा गोळा करण्यासाठी लवकरच दोन घंटागाड्या देणार असल्याचे रोहिणी तावरे यांनी सांगितले.यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश पाटील गोफने,रामभाऊ वाघमोडे, पंनदरे च्या लोकनियुक्त कार्यक्षम सरपंच मीनाक्षी काकी जगताप,उपसरपंच अश्विनी गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य अमित कोकरे,सत्यजीत जगताप ग्रामविकास अधिकारी संजय भोसले,ढाकाळे चे सरपंच चंद्रसेन जगताप,ग्राम विकास अधिकारी वर्षाराणी लोणकर,पाहुणेवाडी चे सरपंच भगवान आप्पा तावरे, ग्राम विकास अधिकारी अवंती ताई चव्हाण, पवईमाळ चे सरपंच अतुल जगताप,धुमाळवाडी चे सरपंच कविताताई सोनवणे, ग्राम विकास अधिकारी भाग्यश्री वायकुळे,माळेगाव खुर्द चे सरपंच सुनील शिर्के, ग्राम विकास अधिकारी संतोष वसेकर, ग्रामपंचायत सदस्य आदित्य काटे देशमुख, खांडज चे सरपंच सुजाता राऊत, तेजस राऊत, दयानंद बर्गे,सूर्यकांत बर्गे,यासह नितीन तावरे, अमित विजयराव तावरे, रियाज शेख, वैभव भोसले, बापूराव शिर्के,राजेंद्र जगताप, संतोष ढेरे, हेमंत घोडके, सागर वाघ, राहुल सस्ते, केतन घुले, सुरज हिवरकर,संतोष भिसे,आशिष कोकरे,कुलदीप तावरे, बंटी राज चव्हाण,मुरली खरात, सचिन कुंभार,तसेच माळेगाव येथील रामनगर ग्रामस्थ व समस्त माळेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.