सोमेश्वरनगर ! जुन्या आठवणींना उजाळा देत इस.सण २००८/२००९ चा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.
साखर शाळा सोमेश्वरनगर येथील विद्यार्थीना शालेय वस्तु व खाऊ वाटप.
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या शाळेतील २००८/२००९ (इयत्ता १० तु. अ.) या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार दि ०३ रोजी विद्यालय प्रांगणात विविध कायर्क्रमांनी रंगला. विशेष म्हणजे १३ वर्ष्यानी हे एकत्र आले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या उजाळा देत केेलेल्या चर्चा व हास्य कल्लोळाने या मेळाव्यात रंगत भरली.या मेळाव्या प्रसंगी माजी विद्यार्थी यांच्या वतीने साखर शाळा सोमेश्वरनगर येथील विद्यार्थीना शालेय वस्तु व खाऊ वाटप करण्यात आले
या वेळी शिक्षक म्हणून वाय एस शिंदे ,पी बी जगताप , तसेच नौशाद बागवान ,संभाजी खोमणे,संतोष होनमाने, शरद ननवरे ही साखर शाळेचे शिक्षक होते . या वेळी निखिल शेंडकर, हिमालय कदम,चैतन्य शिंदे,अभि राक्षे,नितीन कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले तर धीरज गायकवाड यांनी आभार मानले.