इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा कायदेशीर समितीचे सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२१ (सामाजिक कार्य) आज महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री भगत सिंह कोश्यारी जी यांच्या शुभहस्ते राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला.एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आज मला प्राप्त झाला असून या पुरस्काराने अजुन उत्स्फुर्तपणे काम करण्यासाठी प्रेरणा व एक जबाबदारी प्राप्त झाली आहे. असे अंकित पाटील ठाकरे यावेळी म्हणाल्या.
प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले व विविध क्षेत्रातील मान्यवर या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.