निमगाव केतकी या ठिकाणी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट व सुवर्णयोगेश्वरी पतसंस्था यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - निमगाव केतकी या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्य सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट व सुवर्णयोगेश्वरी पतसंस्था यांच्यावतीने घडवून आणण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम बांधवांना तंटामुक्ती अध्यक्ष अतुल (आप्पा) मिसाळ तसेच सुवर्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र (आप्पा) चांदणे यांनी शुभेच्छा दिल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र अशी मानली जाणारी वर्षातून दोनदा अंगारकी चतुर्थी येत असते त्यापैकीच काल अंगारकी चतुर्थीचे अवचित्ते साधून मच्छिंद्र (आप्पा) चांदणे यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुस्लिम बांधवांच्या सुरू असलेल्या उपवास (रोजा) सोडण्यासाठी त्यांना एप्पल केळी कलिंगड द्राक्षे फळांचा ज्यूस देण्यात आला यावेळी पैलवान सचिन चांदणे, बजरंग जगताप, पैलवान सिकंदर मुलानी, सचिन मुलांनी, युनूस शेख, नसिर पठाण, अंनिस मुलानी, मुल्ला सर, आरिफ शेख, वसीम काझी, अहमद मुलाणी तसेच निमगाव केतकी तील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.