Type Here to Get Search Results !

वडगाव निंबाळकर पोलीसांची नाकाबंदी दरम्यान कामगिरी चोरीतील बुलेट मोटार सायकलसह एका आरोपीला अटक


वडगाव निंबाळकर पोलीसांची नाकाबंदी दरम्यान कामगिरी चोरीतील बुलेट मोटार सायकलसह एका आरोपीला अटक
सोमेश्वरनगर - मिळालेल्या माहितीनुसार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीत दिनांक १७/०४/२०१२ रोजी १६.०० वा मौजे वडगाव निबाळकर (ता. बारामती) गावचे हददीत निरा बारामती रोडवर पोलीस ठाण्यासमोर सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे सो यांचे -
आदेशाने सफौ थोपटे,पोहवा/९३८  फणसे पोकॉ, साळुके असे नाकाबंदी करून वाहने चेक करत असताना एक इसम त्याचे ताव्यातील बुलेट मोटार सायकलवरून बारामती बाजुकडुन निरा बाजुकडे जात असतांना पोलीसांनी त्यास थांबवुन
त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राम लक्ष्मण कु-हाडे वय ३० मुळ रा, मानगुल्ली ता.हुकेरी जि. बेळगाव राज्य कर्नाटक हल्ली रा. धानोरे ता शिरूर जि.पुणे असे असल्याचे सांगितले त्याचेकडे असलेल्या बुलेट मोटारसायकल नं एमएच १२ पीएल ७६७६ हीचे बाबत त्याचे कडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्याचेकडे अधिक व सखोल चौकशी केली असता त्याने सदरची मोटार सायकल ही
शिकापुर पोलीस स्टेशनचे हददीतुन पांढरेवस्ती धानोरे, ता. शिरूर जि.पुणे येथुन चोरी करून आणले असलेबाबत सांगितलेने आम्ही तत्काळ सदर इसम व दुचाकी ताब्यात घेवुन शिकापुर पोलीस स्टेशन येथे चौकशी केली असता  शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बुलेट मोटारसायकल नं एमएच १२ पीएल ७६७६ किमंत ८००००/- रुपये ही चोरीस
गेलेबाबत - गुरनं ३७८/२०२२ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असलेचे सांगितले. त्यामुळे सदर आरोपीस मोटार
सायकल सह शिकापुर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले. आहे.
सदरची कामगिरी मा श्री अभिनव देशमुख सो. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा श्री मिलींद मोहीते सो.अमर
पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री.गणेश इंगळे साो. उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती उपविभाग, व
श्री.अशोक शेळके सो. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.सोमनाथ लांडे,पोसई सलीम शेख, सहा फौजदार थोपटे, पोलीस हवालदार महेंद्र
फणसे पोशि/महादेव साळुखे केलेली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test