Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! करंजेपुल येथील सुमित पवार यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मध्ये कनिष्ठ अभियंता पदी निवड.निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुमित पवार यांचा सत्कार

सोमेश्वरनगर ! करंजेपुल येथील सुमित पवार यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मध्ये कनिष्ठ अभियंता पदी निवड.
निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुमित पवार यांचा सत्कार

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील सुमित शिवाजी पवार यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मध्ये कनिष्ठ अभियंता पदी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने निवड झाली .या परीक्षेमध्ये ४६ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधून बारामती तील करंजेपुल येथील सुमित शिवाजी पवार  महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवून या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला सदर विद्यार्थी हा सुकलवाडी तालुका पुरंदर  या गावचा असून परिस्थितीमुळे करंजेपुल या गावी मामा हनुमंत ज्ञानदेव गायकवाड यांच्याकडे लहानपणापासून कुटुंबासह शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठी करंजेपुल या ठिकाणी वास्तव्यास आहे . तरी मामा हनुमंत गायकवाड यांनी स्वतःची परिस्थिती नसतानाही आपला भाचा सुमित पवार याचा शिक्षणाचा पूर्णपणे खर्च केला  डिप्लोमा व पदवीधर शिक्षण पुणे या ठिकाणी पूर्ण करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करंजेपुल येथील ग्रामीण भागातील कै.बाबासाहेब शंकरराव गायकवाड संकुलामध्ये कृष्णाली अभ्यासिका या ठिकाणी  अभ्यास करून कोणतेही क्लासेस न करता व आर्थिक परिस्थिती नसतानाही नाजुक  परिस्थितीमध्ये अभ्यास पूर्ण केला व मोलमजुरी करणाऱ्या आईच्या स्वप्नांना बळकटी देण्याचे काम केलं आईच्या व मामाच्या केलेल्या कष्टाचे चीज झाल्यामुळे चीज केल्यामुळे सोमेश्वर परिसरामध्ये सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे व कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही परिस्थितीवर मात करून एक चांगला अधिकारी होता येतं याचे उत्तम उदाहरण सुमित आहे.

  ३ एप्रिल रोजी झालेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाचा शुभारंभ आणि गव्हाण पूजन कार्यक्रम प्रसंगी करंजेपुल येथील सुमित  पवार यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मध्ये कनिष्ठ अभियंता पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला याप्ररसंगी व्यासपीठावर श्री सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,संचालक ऋषिकेश गायकवाड ,अभिजित काकडे सह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test