सोमेश्वरनगर - बुधवार दिनांक १३एप्रिल२०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले.राष्टीय सेवा योजना अंतर्गत उपक्रम म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.निकाळजे यांनी प्रास्ताविक केले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक एस.एस गायकवाड यांचा परिचय प्राध्यापिका यादव यांनी करुन दिला.स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय बनसोडे यांनी केले.व्याख्यानाचा विषय होता--भारतीय संविधान..या विषयाच्या अनुषंगाने एस.एस.गायकवाड यांनी सखोल विवेचन केले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची विद्यार्थ्यांसाठी पंचसूत्री, संविधान मंडळातील प्रवेश, हिंदू कोड बील,मराठा आरक्षणासाठी डॉ.आंबेडकरांचे योगदान पण तात्कालिन मराठा लोकांनी केलेला विरोध त्यामुळे बाबासाहेब कसे व्यथीत झाले.त्यांचे दृष्टेपण सांगून, डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचे फलित उदाहरणासह मांडणी केली.त्रैमासिक अस्मिता दर्श मधील संकेत या कवितेने समारोप केला. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश हुंबरे उपस्थित होते.आभार प्रा.जगदाळे यांनी मानले